---Advertisement---

धक्कादायक ! दोन्ही मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा आवळला अन् पतीची गळफास घेत आत्महत्या

---Advertisement---

---Advertisement---

आपल्या पत्नीसह मुलांची हत्या करीत पतीने स्वतःलाही संपविल्याची धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेत पतीने प्रथम पत्नीचा गळा आवळला त्यानंतर दोघा मुलांना विष देऊन मारुन टाकले. यानंतर स्वतः पंख्याला लटकून आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट आढळून आली. ही सुसाईड नोट वाचून ते देखील सुन्न झाल्याचे पाहायला मिळाले.

एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि दोन निष्पाप मुलांचा निर्घृण खून केला. त्यानंतर त्या व्यक्तीने आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आणि आजूबाजूच्या भागातील लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी एकत्र आलेत. शुक्रवारी (२५ जुलै) रोजी सकाळी ही भयानक घटना उघडकीस आली. त्यांच्या शेजारी असलेल्या नागरिकांना या घरातून कोणत्याही प्रकारची हालचाल होतांना दिसत नव्हती. यामुळे त्यांना संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना कळविले. वरिष्ठ पोलिस अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

---Advertisement---

पोलिसांनी दरवाजा तोडताच त्यांना दिलीप चितारा (40) यांचा मृतदेह खोलीत फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर त्यांची पत्नी अलका (37) आणि मनवीर (10) आणि खुशबीर (3) ही दोन निष्पाप मुले बेडवर मृतावस्थेत पडली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासकेला असता असे आढळून आले की दिलीपने प्रथम पत्नी अलकाचा गळा दाबून खून केला, नंतर त्याच्या दोन्ही मुलांना विष दिले. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांना दिलीप बऱ्याच काळापासून आर्थिक संकटात असल्याचा संशय आहे. सुमारे 5-6 महिन्यांपूर्वी, दिलीपने त्याचे काका मानक चितारा यांच्याशी कर्जाबद्दल बोलले होते. त्याच्या काकांनी त्याला घर विकून कर्ज फेडण्याचा सल्ला दिला होता, परंतु त्यानंतर या विषयावर कोणतीही चर्चा झाली नाही.

दरम्यान, ही घटना काल शुक्रवारी (२५ जुलै) रोजी राजस्थानच्या उदयपूर इथं घडली. दिवसभर दिलीप यांच्या घरातून काहीएक हालचाल जाणवली नाही. त्यांच्या घरातून कुणीही बाहेर आले नाही. यामुळे पहिल्या मजल्यावर राहणारे घरमालक रवी सचदेव यांना शंका आला. त्यांनी दरवाजा ठोठावला परंतु आतून काहीच उत्तर मिळाले नाही. त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, पोलिसांच्या प्राथमिक तपासकेला असता असे आढळून आले की दिलीपने प्रथम पत्नी अलकाचा गळा दाबून खून केला, नंतर त्याच्या दोन्ही मुलांना विष दिले. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment