---Advertisement---

Gold Price Today : ग्राहकांची चिंता वाढली! स्वस्त झालेले सोने पुन्हा महागले, जाणून घ्या दर

---Advertisement---

Gold Price Today : आज मंगळवारी सोन्याच्या किमतीत ८०० रुपयांची वाढ झाली आहे. देशात २४ कॅरेट सोने १,०२,००० रुपये प्रति १० ग्रॅम दराने आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ९३,८५० रुपये दराने आहे.

जळगावमध्ये २४ कॅरेट सोने दरात १७०० रुपयांची वाढ होऊन ते १ लाख २०० (जीएसटीसह १०३८२४) रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचले आहे. २२ कॅरेट सोने दर ९३७०० रुपये प्रति तोळा, तर १८ कॅरेट सोन्याचा दर ७८६०० रुपये इतका झाला आहे.दुसरीकडे चांदी दरात १००० रुपयांची वाढ होऊन ती विनाजीएसटी ११३००० रुपयांवर पोहोचली आहे.

दुसरीकडे, रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक सोमवारीपासून सुरू झाली आहे. ६ ऑगस्टला आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा बैठकीतील निर्णयांची माहिती देणार आहेत. या बैठकीत आरबीआय रेपो दरात आणखी ०.२५% कपात करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये आज २४ कॅरेट सोने १,०२,३७० रुपये प्रति १० ग्रॅम दराने आहे, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ९३,८५० रुपये आहे. त्याचप्रमाणे, अहमदाबाद, पटना, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता येथे २४ कॅरेट सोने १,०२,२०० रुपये दराने आहे.

अहमदाबाद आणि पटना येथे २२ कॅरेट सोने ९३,७५० रुपये प्रति १० ग्रॅम दराने आहे. तर आर्थिक राजधानी मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता येथे ते ९३,७०० रुपये दराने विकले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---