---Advertisement---
भारतात पेट्रोलच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर हिरो मोटोकॉर्पने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या Splendor+ Flex-Fuel आणि HF Deluxe Flex-Fuel या बाईक्सवर 4,000 रुपयांची थेट सवलत जाहीर केली आहे.
या सवलतीमुळे Splendor+ Flex-Fuel ची किंमत 78,710 रुपये (एक्स-शोरूम) झाली असून ती आता सामान्य E20 मॉडेलपेक्षा केवळ 1,153 रुपये महाग आहे. तर HF Deluxe Flex-Fuel ची किंमत 68,792 रुपये झाली असून ती सामान्य E20 मॉडेलपेक्षा 1,650 रुपये स्वस्त मिळत आहे. ही ऑफर जुलै 2026 पर्यंत लागू राहणार असून या बाईक्सची डिलिव्हरी जुलै 2026 पासून सुरू होणार आहे.
या बाईक्समध्ये 97.2 सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन E20 ते E85 इथेनॉल मिश्रित इंधनावर चालू शकते. यासाठी इंजिनचे ECU मॅपिंग आणि इंधन प्रणालीमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात इथेनॉल वापराला चालना देण्यासाठी E100 इंधन नियमांना मंजुरी देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भविष्यात इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सध्या या फ्लेक्स-फ्युअल बाईक्सची विक्री दिल्ली आणि महाराष्ट्रातील निवडक भागांमध्ये सुरू करण्यात येणार असून, पुढील काळात देशभरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.









