---Advertisement---

धर्मांतर आणि लग्नाला नकार दिल्याने महिलेची हत्या, आरोपी रईस शेखला अटक

by team

---Advertisement---

एका ३५ वर्षीय महिलेची गळा चिरून, चाकूचे वार करून हत्या करण्यात आली. या महिलेने लग्नाला नकार दिला होता आणि इस्लाम धर्मात धर्मांतर करून घ्यायलाही नकार दिला होता. आरोपी रईस शेखला अटक करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील नवारा भागातील ही धक्कादायक घटना आहे.

भाग्यश्री असे या महिलेचे नाव आहे. तिच्यावर शेख रईसने हल्ला केला. या प्रकरणी शेख रईसला काही तासांमध्ये अटक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे. भाग्यश्रीची बहीण सुभद्राने सांगितले की रईस शेखने तिला केस पकडून ओढले. त्यानंतर तिला मारहाण केली, तिला शारीरिक त्रास दिला. धर्मांतर कर आणि लग्नाला होकार दे असे सांगत होता. गेल्या काही दिवसांपासून तो हे करत होता. माझ्या बहिणीने लग्नाला आणि धर्मातराला नकार दिला. त्यामुळे रईसने तिची हत्या केली. तिला रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पोलिसांनी या प्रकरणी नेमकी काय माहिती दिली?

अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंतर सिंग यांनी असे सांगितले की या प्रकरणी आम्ही आरोपीला अटक केली आहे. त्याची चौकशी आम्ही करत आहोत. त्याच्यावर हत्या, मारहाण आणि धर्मांतराचा दबाव या संबंधीची कलम लावण्यात आली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---