निलंबित डॉ. घोलपांच्या गैरवर्तनप्रकरणी १९ जणांचे जबाब,मनपा विशाखा समिती अध्यक्षांकडून चौकशी

---Advertisement---

 

Jalgaon News : महापालिकेचे निलंबित मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांनी सहकारी महिला अधिकाऱ्याशी केलेल्या गैरवर्तन प्रकरणी महापालिकेच्या विशाखा समितीने बुधवारी १९ जणांची चौकशी करून त्यांचे जाबजबाब नोंदवून घेतले. आता या चौकशी समितीच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.

महापालिकेचा निलंबित मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप याची मनपाच्या विशाखा समितीमार्फत चौकशी सुरू आहे. या समितीने डॉ. घोलप यांच्याकडून लेखी खुलासा मागविला होता. डॉ. घोलप याने लेखी खुलासा सादर केल्यानंतर तक्रारदार महिलेचाही जबाब समितीने घेतला आहे. तत्पुर्वी संबंधित महिला वैद्यकीय अधिकारी यांनी डॉ. घोलप याच्याविषयी लेखी गंभीर आरोप केले आहे. तसेच तक्रार मागे घेण्यासाठी देखिल विविध प्रकारे डॉ. घोलपकडून दबाव आणला जात असल्याचे महिला अधिकाऱ्याने लेखी जबाबात म्हटले आहे.

दुपारपासून चौकशी

डॉ. घोलप यांच्या कारनाम्याची महापालिकेच्या विशाखा समितीकडून चौकशी केली जात आहे. बुधवारी दुपारपासून विशाखा समितीच्या अध्यक्षा तथा उपायुक्त धनश्री शिंदे यांच्या दालनात वैद्यकीय विभागातील १९ कर्मचाऱ्यांशी वैयक्तीक चर्चा करून त्यांचे जाबजबाब नोंदवून घेतले आहे. समितीकडून चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवाल आयुक्तांना सादर होणार आहे. त्यामुळे विशाखा समिती आता नेमका काय अहवाल देते? याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

आधीच निलंबनाची कारवाई

महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे डॉ. घोलप यांच्याविषयी तक्रार दाखल झाल्यानंतर आयुक्तांनी डॉ. घोलप यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे अहवाल आल्यानंतर आता पुढची कारवाई होईल अशी चर्चा होत आहे.

शहरात दोन दिवस मांस, मटन विक्री बंद

शहरात शुक्रवारी १५ रोजी श्रीकृष्ण जयंती आणि २७ ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी निमित्त दोन दिवस मांस, मटन विक्री बंद ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त उदय पाटील यांनी दिले आहेत. तसेच बंदीनंतरही मांस विक्री केल्यास संबंधितांवर पोलिसांमार्फत कारवाई केली जाईल असेही आदेशात म्हटले आहे.

तीन दिवसात खड्डे बुजविण्याचे काम

गणेशोत्सवापूर्वी शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे आश्वासन आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिले आहे. त्यानुसार येत्या तीन दिवसात या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. त्यासाठी आवश्यक ते साहित्य देखिल महापालिकेला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे गणरायाच्या आगमनापूर्वी रस्त्यांची दुरूस्ती होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---