Crime News : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, एकास अटक, चौघे फरार

---Advertisement---

 

भुसावळ : महिलेस लग्नाचे अमिष दाखवून मनाविरुद्ध शारीरिक सबंध प्रस्तापित करणाऱ्या व्यक्ती तसेच त्याला सहकार्य करणारे नातेवाईक व मित्रांविरुद्ध पोलीस स्टेशनला अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित रोहन राजू भोई असे नाव त्यास असून अटक करण्यात आली.

भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील संशयित राजू भोई याने पीडित महिलेस लग्नाचे अमिष दाखवून मनाविरुद्ध शारीरिक संबध प्रस्तापित केले. त्याने तिच्या सोबत आजपावेतो लग्न केलेले नाही. तिच्या अज्ञातपणाचा व परिस्थितीचा गैरफायदा घेवून संशयित राजू भोई याने व त्याचे नातेवाईक व मित्र यांनी संशयितास वेळोवेळी गुन्ह्यात मदत केली.

या सर्वानी पीडित मुलीस जातीवाचक शिवीगाळ केली व पीडित मुलीची आई, भाऊ यांना जिवंत ठेवणार नाही व तुमचे घर पेटवून देवू अशी धमकी देखील दिली. पीडित मुलीने बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी ( १४ ऑगस्ट) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---Advertisement---

 

पोलिसांनी संशयित राजू भोई यास अटक केली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यातील चार संशयित व्यक्ती ह्या फरार आहेत. गुन्ह्याचा अधिक तपास उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित करीत आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---