---Advertisement---
जळगाव : काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीबद्दल अपशब्द काढत अपमानजनक रेखाटने केली आहेत. हा समस्त मातृशक्तीचा अपमान आहे असे म्हणत जळगावात भाजपा महिला आघाडीतर्फे आंदोलन करून काँग्रेसचा निषेध करण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला शाई फासून जोडे मारुन निषेध करण्यात आला.
मातृशक्तीचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या गलिच्छ विचाराचा भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर महिला मोर्चाच्यावतीने निषेध करण्यात आला. महिला आघाडीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

---Advertisement---
याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, महानगर जिल्हाअध्यक्ष दीपक सूर्यवंशी माजी महापौर सीमा भोळे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, सरचिटणीस भारती सोनवणे, नितीन इंगळे, शक्ती महाजन, दीपक परदेशी, आशिष सपकाळे, मिलिंद चौधरी, रेखा वर्मा, नंदिनी दर्जी, भूषण लाडवंजारी, दिप्ती ताई चिरमाडे, गायत्री राणे, नीलाताई चौधरी, रेखा पाटील, सविता बोरसे, प्रियंका सोनी, छाया सारस्वत, माधुरी देशमुख, स्मिता वेद, सुरेखा तायडे, युवा मोर्चा पदाधिकारी रोहित सोनवणे, कल्पेश सोनवणे, स्वप्नील चौधरी, हितेश राजपूत, गणेश बाविस्कर यांच्यासह सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
