भुसावळमध्ये दोन गावठी पिस्तुलसह दोघ पोलिसांच्या जाळ्यात

---Advertisement---

 

भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने दोन गावठी पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसेसह दोन संशयितांना अटक करत शहरातील मोठा गुन्हा रोखण्यात यश मिळवले आहे.पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

दि.२२ ऑक्टोबर रोजी रात्री पोलिस विजय नेरकर आणि जावेद शहा हे गस्तीदरम्यान पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की,रेकॉर्डवरील आरोपी कुणाल नितीन ठाकूर (वय १९,रा.कस्तुरी नगर, भुसावळ) हा रंगोली हॉटेलजवळील त्रीमुर्ती प्रोव्हिजन समोर गावठी पिस्तुल व जिवंत काडतुस घेऊन गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत होते.

या माहितीच्या आधारे डी.बी.पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.झडतीदरम्यान त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे मिळाली.चौकशीत त्याने हे शस्त्र वरणगाव येथील उदय राजू उजळेकर (वय २४) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार उजळेकर यास अटक करून चौकशी करण्यात आली असता त्याने आणखी एक गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस लपवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी ती शस्त्रे जप्त केली.दोन्ही आरोपींकडून मिळून दोन गावठी पिस्तुल (मूल्य अंदाजे ₹५८,०००) आणि तीन जिवंत काडतुसे (मूल्य ₹३,०००) असा एकूण ₹६१,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.क्रमांक ४८८/२०२५, भा.दं.वि.कलम ३/२५, ५/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस विजय बळिराम नेरकर करत आहेत.या यशस्वी कारवाईत पो.उपनिरीक्षक मंगेश जाधव,पोलिस राजेश काळे,पंकज तायडे, चालक सहा.फौ.सुनिल सोनवणे, चालक सहा.फौ.हसमत अली सय्यद तसेच वरणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस प्रशांत ठाकुर , यासिन पिंजारी आदींचा सहभाग होता.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---