संगणकाच्या मेमरीसाठी मशरूमचा वापर, विद्युत आणि रासायनिक संकेतांमुळे लागला शोध

---Advertisement---

 

वॉशिंग्टन : संगणकाच्या मेमरीसाठी शस्त्रज्ञांनी भन्नाट शोध लावला आहे. त्यांनी शिताके मशरूममधील मायसेलियमचा वापर करून मेमरी रजिस्टर तयार केले. त्यांच्या या कृतीमुळे अत्यंत स्वस्तात मेमरी हार्डवेअरला पर्याय उपलब्ध झाला आहे.
या मशरुममधील मेमरिस्टर मायसेलियमच्या चेतापेशीसारख्या गुणधर्माचा वापर करून भूतकाळातील अवस्था लक्षात ठेवतो. टिटॅनियम डायऑक्साईड किंवा सिलिकॉनसारख्या पदार्थापासून बनवलेल्या सध्याच्या मेमरी हार्डवेअरला हा नवीन आयाम देऊ शकतो.

शास्त्रज्ञांना मिळालेल्या या यशामुळे मेंदूप्रमाणे कार्य करणारा संगणक विकसित करणे शक्य होणार आहे. न्यूरॉन्समधील माहितीचा प्रवाह व्यवस्थापित करण्यासाठी सायनॉप्ससारख्या मेमरिस्टर्सचा वापर यासाठी केला जातो. मज्जातंतूंप्रमाणे काम करणाऱ्या मायक्रोचिप्स तयार करणे शक्य आहे. त्यामुळे तुम्हाला स्टॅण्डबाय मोड आणि मशीनचा वापर केला जात नसताना जास्त ऊर्जेची गरज भासणार नाही, अशी माहिती ओहयो विद्यापीठाचे मानसोपचार तज्ज्ञ जॉन लारोको यांनी सांगितले. यामुळे प्रचंड संगणकीय तसेच आर्थिक फायदा होऊ शकतो, असे ते म्हणाले.

मेंदूप्रमाणे वर्तन, विद्युत आणि रासायनिक संदेशवहन करण्याची म्हणजेच मायसेलियल नेटवर्कची क्षमता असल्याने मशरूमला संगणकाचा भाग करता येईल का, याची चाचपणी सध्या संशोधक करीत आहेत. मात्र, या क्षमतांचा पुरेपूर वापर करण्यासाठी अभियांत्रिकीची गरज आहे. मजबुती आणि लवचिकतेमुळे संशोधकांनी शिताके मशरूमची निवड केली. त्यांनी नियंत्रित परिस्थितीत मशरूमचे नऊ नमुने वाढवून मेमरिस्टर विकसित केले.

१७० मायक्रोसेकंदांनी बदलवतात संकेत

संशोधकांनी त्यांच्या ‘मशरिस्टर’ वर ५.८५० हर्ट्सचा स्विचिंग स्पीड नोंदवला. यामुळे सुमारे ९० टक्के अचूकता मिळाली. याचा अर्थ असा की, हे उपकरण अंदाजे दर १७० मायक्रोसेकंदांनी संकेत बदल करू शकते. अगदी मूलभूत व्यावसायिक मेमरिस्टरच्या तुलनेत हा वेग कमी आहे. हे मेमरिस्टर मशरिस्टरच्या तुलनेत जवळपास दुप्पट वेगाने काम करतात. मात्र, सुरुवातीचे निकाल आशादायी आहेत, असे लारोको म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---