Jamner News: गौणखनिजाची अवैध वाहतूक, जामनेर पोलीसात गुन्हा दाखल

---Advertisement---

 

Jamner News:  जामनेर तालुक्यातील नेरी ते पळासखेडा मिराचे परिसरात गौणखनिजाच्या अवैध वाहतूकीवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईमुळे गौणखनिज माफियांचे धाबे दणाणले असून कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी होत आहे.

याबाबत माहिती अशी की, पोलिसांचे पथक दि. ४ नोव्हेंबर रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना तालुक्यातील नेरी ते पळासखेडा मिराचे रोडवर शेखर सोनवणे हा त्याच्या ताब्यातील डंपर क्रमांक एम एच २१ बी एच ५४८३ ने वाळूची अवैध वाहतूक करताना पथकाला मिळून आला. त्यानुसार पथकाने वाळूसह डंपर ताब्यात घेत या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील यांच्या फिर्यादीवरुन शेखर सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास शिंदे करीत आहे.

नाचनखेडा येथून २३ वर्षिय तरुणी बेपत्ता

तर दुसऱ्या घटनेत तालुक्यातील पहूर पोलीस स्टेशन हद्दीतील नाचनखेडा येथून २३ वर्षिय तरुणी बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी हरवल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती दि. ५ नोव्हेंबर रोजी पोलिसीनी दिली. याबाबत माहिती अशी की, नचनखेडा येथील २३ वर्षिय तरुणी हि दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता कॉलेजला जाते असे सांगुन घरातून निघून गेली आहे. तिचा इतरत्र शोध घेतला असता ती मिळून न आल्याने तिच्या पालकांनी खबर दिल्याने पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उद्दल चव्हाण करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---