---Advertisement---
पाचोरा, प्रतिनिधी : तालुक्यातील चिंचपुरे येथील ग्रामसेवक गावात आठवड्यात एकदाच येत असून मनमानी कारभार करून ग्रा. पं. सदस्यांना विश्वासात घेत नसल्याने त्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी सरपंचासह सदस्यांनी आ. किशोर पाटील व गट विकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा तालुक्यातील चिंचपुरे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नरेश श्रावण आल्हाट हे कर्तव्यावर असताना त्याच गावात रहाणे बंधनकारक असताना देखील चिंचपुरे गावात न रहाता पाचोरा येथून आठवड्यात एकदाच गावात येतात.सरपंचासह सदस्यांचे ही ऐकत नाही.गावात मनमानी कारभार करुन निकृष्ठ कामे करीत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
गावातील दलीतवस्तीचे काम देखील निकृष्ट पद्धतीने करीत असून स्वतःच काम करून गैरव्यवहार करीत असल्याचे म्हटले आहे.या ग्रामसेवकाची गावातून बदली करण्याची मागणी ग्रामपंचायत तर्फे करण्यात आली आहे.
आ.किशोर पाटील यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनावर सरपंच वंदना गजानन पाटील,उपसरपंच पंकज कैलास पाटील,ग्रा पं सदस्य सुनीता भागवत पाटील,रुपाली पाटील छबो तडवी, चंद्रकला पाटील, कैलास भिसे यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.









