---Advertisement---
नशिराबाद, प्रतिनिधी : नशिराबाद-जळगाव महामार्गालगत टीव्ही टॉवरसमोरील मन्यारखेडा शिवारातील एका सिमेंट काँक्रीटच्या पक्क्या घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर नशिराबाद पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी पाच तरुणींना ताब्यात घेतले असून, हा व्यवसाय चालवणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी काही महिला व मुलींना डांबून ठेवून त्यांच्याकडून अवैधरीत्या वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती नशिराबाद पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नशिराबाद पोलिसांनी तातडीने जळगाव ए.एच.टी.यू. (मानवी तस्करी विरोधी पथक) च्या मदतीने कारवाईची योजना आखली.
छाप्याच्या वेळी घरात पाच तरुणी आणि दोन चालक उपस्थित होते. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली असता, ६३ हजार ८० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी राहुल कडू पाटील (रा. रायपूर फाटा, जळगाव) आणि राम विश्वास बोरसे (रा. रामेश्वर कॉलनी, मेहरूण, जळगाव) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. यासह चेतन माळी व श्याम विश्वास बोरसे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक आसाराम मनोरे, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र तायडे, सहायक फौजदार संजय महाजन, हवालदार शरद भालेराव, चंद्रकांत पाटील, गणेश गायकवाड, सागर भिडे, मोनाली दहीभाते, युगंधरा नारखेडे, भूषण पाटील, युनूस शेख, ज्ञानेश्वर पवार, तसेच ए.एच.टी.यू.च्या अधिकारी, कर्मचारी यांच्या पथकाकडून करण्यात आली.









