---Advertisement---
जामनेर : निवडणुकीसाठी दि. १० तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी विनायक गोसावी यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी नागरिकांनी बैठकीत शहरातील बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत व मतदान केंद्र केंद्रांबाबत चर्चा झाली. नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना उमेदवाराने मिरवणुकीने आल्यास कार्यालयापासून 100 मीटर अंतरावर थांबवण्यात यावे, तसेच अर्ज सादर करताना अर्जदारासोबत फक्त चार जणांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती प्रांत विनय गोसावी यांनी दिली.
या बैठकीस सहाय्यक निवडणूक अधिकारी नितीन बागुल पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. चर्चेत गणेश झाल्टे रिजवान शेख व जगदीश बोरसे एडवोकेट भरत पवार श्रीराम महाजन डॉक्टर भोंडे यांनी सहभाग घेतला या निवडणुकीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरून त्याची प्रिंट जमा करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.









