---Advertisement---
जळगाव : मुंबई, चेन्नई आणि कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या संशयास्पद मेसेजमुळे मध्य रेल्वेच्या संपूर्ण मार्गावर मोठी खळबळ उडाली. दरम्यान, संबंधित गाडीची तपासणी करून भुसावळ स्थानकावरून रवाना करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक्सप्रेसच्या एका डब्याच्या शौचालयात पाकिस्तानी जिंदाबाद, आयएसआय यांसारख्या देशविरोधी वाक्य लिहिलेले आढळून आले. यामुळे सुरक्षा यंत्रणा तातडीने कामाला लागल्या आणि सर्व प्रमुख रेल्वे स्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आले.
महानगरी एक्सप्रेसच्या एका डब्यातील स्वच्छतागृहात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धमकी वजा संदेश लिहिलेला होता. तसेच गाडीमध्ये बॉम्ब असल्याची गंभीर सूचनाही देण्यात आली होती.
त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र मेसेज मिळतात सुरक्षा यंत्रणांच्या निदर्शनात येताच सर्वत्र अलर्ट जारी करण्यात आले.
भुसावळ थांबकावर प्रवाशांची तसेच रेल्वेची शानपथक रेल्वे सुरक्षा बल व विशेष पथकाद्वारे महानगरी एक्सप्रेसची कसून तपासणी करण्यात आली.
यावेळी प्रवाशांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र तपासांती दरम्यान कुठलेही अनोळखी वस्तू गाडीमध्ये आढळून आले नाही. त्यामुळे ही गाडी भुसावळ स्थानकावरून रवाना करण्यात आली आहे.
प्रवाशांना आवाहन
दरम्यान, गाडीतील प्रवाशांना अनोळखी वस्तू, व्यक्ती आढळल्यास तात्काळ रेल्वे प्रशासनाला संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.









