बापरे! होमगार्ड घरातच चालवत होता कुंटणखाना; पोलिसांचा अचानक छापा अन्…

---Advertisement---

 

जळगाव : जिल्हयात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. भरवस्तीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या होमगार्ड पतीसह पत्नी आणि अन्य एका महिलेला येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या घटनेबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांत असे अनेक प्रकरणे उघडकीस आली आहे. त्यानुसार येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकडून कारवाई करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील धानोरा येथे ही कारवाई करण्यात आली आहे.

भरवस्तीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या होमगार्ड पतीसह पत्नी आणि अन्य एका महिलेला जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. संशयित आरोपींना अडावद पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या घटनेबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारू भट्टीवर पोलिसांची धाड

धरणगावच्या निंभोरा येथे वीर फाटा रोडजवळ झाडांच्या आडोशात सुरू असलेल्या गावठी दारू निर्मितीच्या भट्टीवर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. पहिल्या कारवाईत निळ्या ड्रममध्ये ठेवलेले सुमारे १,००० लिटर कच्चे रसायन, दुसऱ्या कारवाईत २०० लिटर रसायन उद्ध्वस्त केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---