दुर्दैवी! उसाला लागलेल्या आगीत महिलेचा होरपळून अंत, जळगाव जिल्ह्यातील घटना

---Advertisement---

 

जळगाव : उसाच्या जाळलेल्या पाचटची ठिणगी शेजारच्या शेतातील उसात पडली. त्यात लागलेल्या आगीत महिलेचा होरपळून मृत्यू झाला. ही थरारक घटना सायगाव (ता. चाळीसगाव) परिसरातील शेतात बुधवारी (ता. १९) दुपारी १२:३० ते एक वाजेच्या सुमारास घडली. रेखा दत्तात्रेय माळी (४२, रा. सायगाव, ता. चाळीसगाव) असे या मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. १९) सकाळी रेखा माळी मजुरीसाठी शेतात गेल्या होत्या. या परिसरातील एका शेतातील ऊस कारखान्याकडे पाठविण्यात आल्यानंतर शिल्लक पाचट जाळले जात होते. त्यातीलच एक ठिणगी शेजारच्या शेतातील उसात उडाली.

वाऱ्यामुळे उसाने पेट घेतला. त्याच वेळी रेखा माळी या याच उसाच्या शेतात काम करीत होत्या. या ठिणगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर रेखाबाई यांचा त्यात होरपळून मृत्यू झाला. आग लागल्याचे लक्षात येताच शेतातील अन्य मजूर महिला तिथे पोहोचल्या; परंतु आग मोठी असल्याने त्या माघारी फिरल्या आणि मालकाला या आगीची माहिती दिली.

आग शांत झाल्यानंतर रेखाबाई या आगीत जळून मृत झालेल्या आढळून आल्या. रेखा माळी यांच्या पश्चात पती, दोन मुले, असा परिवार आहे. याबाबत मेहुणबारे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---