भुसावळमध्ये अजित पवार गटात अंतर्गत कलह? थेट न्यायालयात जाण्याच्या तयारीत, नेमकं काय घडलं…

---Advertisement---

 

जळगाव : भुसावळ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अजित पवार गटातील अंतर्गत कलह अन् विश्वासघाताचे आरोप करण्यात आले आहे. यातून आपली पत्नी सारिका पाटील यांचा अर्ज छाननीत अवैध ठरला, असा आरोप युवराज पाटील यांनी केला आहे.

महिला राखीव प्रभाग क्र. ७’अ’मध्ये निवडणूक प्रक्रियेत तांत्रिक चुकीमुळे उमेदवार अपात्र ठरल्याने पक्षांतर्गत संघर्ष तीव्र झाला आहे. राष्ट्रवादी अजित गटाकडून सारिका युवराज पाटील यांची उमेदवारी दाखल करण्यात आली होती. मात्र पक्षाने दिलेल्या फॉर्म (नामनिर्देशनाची अधिकृत हमी) मध्ये नावाबाबत तांत्रिक त्रुटी आढळल्या.

‘सारिका युवराज पाटील’ ऐवजी ‘सारिका पुंडलिक पाटील’ असा उल्लेख झाला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे तपासून सारिका यांचा अर्ज अवैध घोषित केला. यामुळे त्यांच्याविरोधातील एकमेव उमेदवार प्रीती मुकेश पाटील यांना बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

युवराज पाटील यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर सुमारे पाच मिनिटांच्या व्हिडिओद्वारे आरोप केले आहेत. त्यांच्या मते, पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी सर्व उमेदवारांसाठी फॉर्म जमा करण्याचे आश्वासन दिले, पण ते तोडल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे अंतर्गत असंतोष वाढला आहे.

फॉर्ममध्ये जाणीवपूर्वक चुकीचे नाव लिहिले, जेणेकरून सारिका पाटील अपात्र ठरेल आणि प्रीती पाटील यांची निवड बिनविरोध येईल, असा आरोप युवराज पाटील यांनी केला आहे. अपात्रतेच्या विरोधात सारिका युवराज पाटील न्यायालयात जाणार असल्याचे युवराज पाटील यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---