---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी अनेक मातब्बरांचे उमेदवारी अर्ज बाद झाले. दरम्यान, मतदान होण्या आधीच भाजपाने जिल्ह्यात तीन ठिकाणी खाते उघडून आघाडी घेतली आहे. अशात पुन्हा एक मोठी बातमी समोर आली असून, जामनेर नगराध्यक्षपदी भाजपच्या साधना महाजन यांची बिनविरोध निवड निच्छित झाली आहे. विशेषतः यामुळे साधना महाजन यांनी बिनविरोध हॅट्रिक्ट साधली आहे.
जिल्ह्यात सध्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मंगळवारी (ता. १८) रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. या छाननीत अनेकांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद ठरविण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान भाजपाचे तीन ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार बिनविरोध निश्चीत झाले आहे. यात भुसावळ येथे वार्ड क्र. ७ अ मधून भाजपच्या प्रीती मुकेश पाटील, जामनेरमध्ये वार्ड क्र. ११ ब मधून भाजपच्या उज्वला दीपक तायडे, सावदा मध्ये वार्ड क्र. ७ अ मधून भाजपच्या रंजना जितेंद्र भारंबे बिनविरोध निश्चीत झाल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ जामनेर व सावदा या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक पदाचे प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. विशेष म्हणजे बिनविरोध झालेल्या तीनही नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने या तीन जागांवर भाजपला बिनविरोध करण्याला यश मिळाले आहे.
जामनेरमध्ये नेमकं काय घडलं?
जामनेर नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी ५ उमेदवारांचे ९ अर्ज दाखल झाले होते. यात साधना गिरीश महाजन, रुपाली पारस ललवाणी, प्रतिभा संतोष झाल्टे, ज्योत्स्ना विसपुते व सरीता ज्ञानेश्वर बोरसे यांनी अर्ज दाखल केला. त्यातील ४ अर्ज वैध ठरले. नगरसेवक पदाच्या २७ जागांसाठी दाखल २४४ पैकी ९३ अर्ज वैध ठरले आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी विकासाला प्राधान्य देत, अर्थात ना. गिरीश महाजन यांच्या कामाला प्राधान्य देत उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. यामुळे साधना महाजन यांची बिनविरोध निवड निच्छित झाली आहे. विशेषतः यामुळे साधना महाजन यांनी बिनविरोध हॅट्रिक्ट साधली आहे.
सहा नगरसेवक बिनविरोध
उज्वला दीपक तायडे प्रभाग क्रमांक 11 ब, सपना रवींद्र झाल्टे प्रभाग क्रमांक एक अ, किलुबाई गीमल्या शेवाळे प्रभाग क्रमांक 13 ब, श्रीराम महाजन प्रभाग क्रमांक दोन, संध्या जितेंद्र पाटील प्रभाग क्रमांक पाच, तर महेंद्र कृपाराम बाविस्कर प्रभाग क्रमांक 13, हे जामनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहे.









