सापळ्याचा संशय आला अन् त्याने फिरवले मन, पण… लाचखोरांच्या गोटात खळबळ

---Advertisement---

 

जळगाव : बिल मंजुरीसाठी पाच हजारांची लाच मागणी केल्याप्रकरणी भुसावळच्या दीपनगर येथील बीटीपीएस विभागातील अधीक्षक अभियंताविरोधात गुन्हा दाखल करून जळगाव एसीबीने अटक केली. यामुळे लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. भानुदास पुंडलिक लाडवंजारी (५७) असे लाचखोराचे नाव आहे.

दीपनगर २१० प्रकल्पातील एका कंपनीत तक्रारदार हे साईट सुपरवायझर आहेत. २८ नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान २१० प्लांटच्या तळाशी जमणारी राख उचलण्यासाठी तसेच मोडतोड व तेलाचे बॅरेल काढण्यासह वाहतूक करण्यासाठी संबंधित कंपनीने दोन लाख २८ हजार ५४४ रुपयांचे बिज बीटीपीएस विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडे सादर केले होते. आरोपी भानुदास लाडवंजारी याने सदरील बिल मंजुरीसाठी पाच टक्के प्रमाणे पाच हजारांची लाच मागितल्याने एसीबीकडे लेखी तक्रार नोंदवण्यात आली.

ही कारवाई जळगाव एसीबीने पोलीस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, हवालदार किशोर महाजन, नाईक बाळू मराठे, शिपाई अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर, भूषण पाटील आदींच्या पथकाने केली.

सापळ्याचा संशय आल्याने स्वीकारली नाही लाच

संशयित आरोपीवर २९ एप्रिल २०२५ रोजी एसीबीने सापळा रचला मात्र कारवाईबाबत संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही. नाही, दरम्यान एसीबीच्या लाच पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध झाल्याने व वरिष्ठांचा अहवाल येताच गुरुवार, २० रोजी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---