हाय व्होल्टेज निवडणूक : पारोळ्यात महायुतीविरोधात जनआधार आघाडी मैदानात

---Advertisement---

 

विशाल महाजन
पारोळा :
येथील पालिका निवडणूक निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. शिवसेना भाजप महायुतीच्या बाजूने सत्ताधारी आमदार अमोल पाटील मैदानात उतरले आहेत, तर जनआधार पार्टीकडून माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, माजी नगराध्यक्ष करण पवार रणांगणात आहेत. त्यामुळे पालिका निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.

पारोळा शहर जिल्ह्याचे राजकारणाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. या शहराने आमदार, खासदार, पालकमंत्री अशी विविध पदे या शहराने भूषवले आहेत. तसेच येथील राजकारणी जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या संस्थावर आपला प्रभाव टिकवून आहेत. त्यामुळे पारोळा शहर जिल्ह्याचे राजकारणाचे केंद्रबिंदू मानले जाते. यामुळे या शहराच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

शहरात ३७ हजार ३०१ मतदार आहेत. नगरपालिका १२ प्रभागात विभागले असून २४ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यापैकी ५० टक्के महिला आरक्षणानुसार १२ महिला या नगरसेविका असणार आहेत. महायुतीचे उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील रणांगणात उतरले आहेत तर जनआधार पार्टीकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून माजी नगरसेविका तथा माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या पत्नी अंजली करण पवार मैदानात आहेत. तसेच कॉंग्रेसकडून सुवर्णा वसंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

नगराध्यक्ष पदाचे ३ उमेदवार असले तरी प्रमुख लढत ही महायुतीविरुद्ध जनआधार पार्टी अशी होणार असत्याचे चित्र आहे. नगराध्यक्ष पदाची लढत ही दुरंगी होणार असून अत्यंत चुरशीची होणार आहे. माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील आमदार अमोल पाटील, माजी नगराध्यक्ष करण पवार ही खिंड लढवत आहेत. त्यामुळे निवडणूक रंगात आली असून अंगात हुडहुडी भरविणाऱ्या थंडीत वातावरण तापू लागले आहे.

लढतीकडे शहरवासीयांचे लक्ष

प्रभाग क्र. ८ ब मध्ये माजी उपनगराध्यक्ष तथा भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले डॉ. मंगेश तांबे यांच्याविरुद्ध जनाधार पार्टीचे प्रकाश पाटील आहेत. प्रभाग १२ अ मध्ये माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांची सून तर जि.प.चे माजी सदस्य यांच्या पत्नी वर्षा रोहन पाटील यांच्याविरुद्ध स्मिता छोटू पाटील प्रभाग १२ ब मध्ये माजी खासदार वसंतराव मोरे यांचे सुपुत्र तथा माजी नगरसेवक रोहन मोरेंविरुद्ध माजी नगरसेवक पी.जी. पाटील यांची लढत होणार आहे. प्रभाग क्र.४ व शिवसेनेचे शहरप्रमुख अमृत चौधरी विरुद्ध माजी प्रभारी नगराध्यक्ष अशोक चौधरी यांचा सुपुत्र रितेश चौधरी यांची थेट लढत होणार आहे.

प्रभाग क्र. ६ अ मध्ये माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांचे सुपुत्र तथा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले अमोल शिरोळे विरुद्ध सलग तीनदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले मनीष पाटील यांचे तगडे आव्हान आहे. तर माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांच्या पत्नी वंदना शिरोळे यांच्याविरुद्ध माजी नगरसवेक मनीष पाटील यांच्या पत्नी कविता पाटील आहेत. या काही प्रमुख लढतीकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---