---Advertisement---
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग सहाच्या चौपदरीकरणासाठी शासनाने जमीन भूसंपादन केली आहे. जागेचे खोटे कागदपत्र सादर करुन संशयित महिलेने मीच खरी जमीन मालक आहे, असे भासवून तोतयेगिरी केली. शासनाची १६ लाख ९७ हजार ३२६ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी नायब तहसिलदार यांच्या तक्रारीनुसार धुळे येथील संशयित महिलेविरुध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
२१ ऑगस्ट २००८ ते २३ ऑगस्ट २०१८ दरम्यान जळगाव शहरातील भूसंपादन तथा उपविभागीय जळगाव भाग कार्यालयत येथे गट नं. २२०६ मध्ये प्लॉट नं.तीन व प्लॉट नं.चार या मधुन सन २०११ मध्ये अनुक्रमे भूसपादन निवाडा क्रमाक २४ व २५/२०११ प्रमाणे १५० चौ.मी. तसेच सन २०१३ मध्ये भूसंपादन निवाडा क. ०६/२०१३ अन्वये प्लॉट नं. तीन व चार यातून ३३८ चौ.मी. असे एकूण ४८८ चौ.मी. क्षेत्राचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग क्र. सहा चे चौपदरी करणासाठी भूसंपादन करण्यात आलेली आहे.
या जागेची मोबदल्याची रक्कम ही खोटे कागदपत्र सादर करुन मीच खरी मालक आहे, असे भासवुन तोतयेगिरी केली. तसेच शासनाकडून १६ लाख ९७ हजार ३२६ रुपये घेऊन शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी नायब तहसिलदार विकास लाडवंजारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुष्पा देवराम जावळे (वय ५८, रा. प्लॉट नं. १ अंबिका सोसायटी, अभय महाविद्यालयजवळ धुळे) हिच्या विरुध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बुधवारी (१९ नोव्हेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर हे यावेळी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख हे तपास करीत आहेत.
अशी ही बनवाबनवी
पुष्पा देवराम जावळे (वय ७०, रा. प्लॉट नं. २०, गणेश कॉलनी, भुसावळ) यांच्या मालकीच्या मौजे नशिराबाद येथील गट नं. २२०६ मध्ये प्लॉट नं. ३ व ४ या मधुन सन २०११ मध्ये अनुक्रमे भूसंपादन निवाडा क्र.२४ व २५/२०११ प्रमाणे १५० चौ.मी. तसेच सन २०१३ मध्ये भूसंपादन निवाडा क्र. ६/२०१३ अन्वये प्लॉट न.३२ व ४ यातुन ३३८ चौ.मी. असे एकूण ४८८ चौ.मी. क्षेत्राचे महामार्ग चौपदरीकरणासाठी भुसंपादन करण्यात आले आहे. साधर्म नावाचा फायदा उचलत संशयित महिलेने रक्कमेचा मोबदला घेतला. २८ ऑगस्ट २०१९ रोजी मुळ जागा मालक पुष्पा देवराम जावळे (मुळ रा. भुसावळ हमु कोथरुड पुणे) यांनी भूसंपादन जमिनीचा मोबदल्यात रक्कम मिळावी, यासाठी अर्ज केला असता संशयित महिलेची बनवाबनव उघडकीस आली.









