पहूरनजीक भीषण अपघात; जामनेरचे तीन तर पहूरचा एक तरुण ठार

---Advertisement---

 

जामनेर : पहूर-जामनेर रस्त्यावरील पिंपळगाव गोलाईत गावाजवळ दुचाकी व अवजड वाहनाच्या भीषण अपघातात जामनेरातील तीन व पहूरचा एक असे चार तरुण जागीच ठार झाले तर अवजड वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास घडली.

अतुल चंद्रकांत सुरवाडे, अंकुश समाधान लोखंडे व अजय (पूर्ण नाव माहीत नाही, तिघे रा. जामनेर) तसेच रवींद्र सुनील लोंढे (रा. पहूर) अशी मयतांची नावे आहेत. हे सर्व २२ ते २४ वयोगटातील आहेत.

मालवाहू वाहनात जनावरांची हाडे

अपघातग्रस्त अवजड वाहनात जनावरांची हाडे आढळली. ही हाडे कोठून कोठे नेली जात होती, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. तसेच जखमी अवजड वाहन चालकाचे नावदेखील रात्री उशिरापर्यंत कळू शकले नव्हते.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे तसेच गोपाळ माळी, जीवन चव्हाण, ईश्वर कोकणे यांनी धाव घेतली.

पहूरचे सरपंच अब्बू तडवी व ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील तेथून जात असताना त्यांनी थांबून जखमीला जामनेर रुग्णालयात हलविण्यासाठी मदत केली. चारही मृतदेह जामनेर रुग्णालयात आणल्यावर मृतांच्या नातेवाईकांनी त्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---