शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनाला यश; शेंदुर्णीत मक्का खरेदीस लिलाव पद्धतीने सुरुवात!

---Advertisement---

 

शेंदुर्णी, ता. जामनेर : शेंदुर्णीत मका खरेदीला व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळत असल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी दि. 25 नोव्हेंबर रोजी केलेल्या रास्ता रोको आंदोलनास अखेर यश आले आहे. दखल घेत बाजार समितीचे पदाधिकारी व अधिकारी यांनी शेंदुर्णीत येऊन उपबाजार समितीच्या आवारात लिलाव पद्धतीने मक्का सुरू करून शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मकता दाखवल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.

जामनेर बाजार समितीच्या उपबाजार शेंदुर्णीमध्ये व्यापारी वर्गाकडून मक्का खरेदीला ८०० ते हजार रुपयेपर्यंत भाव देत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व संताप व्यक्त होऊन त्यांनी बाजार समितीच्या बाहेर रास्ता रोको करून आंदोलन पुकारले होते मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून बाजार समितीच्या संचालकांशी बोलणे केले त्यावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी सकाळी अकरा वाजता बाजार समितीचे पदाधिकारी व सचिव यांनी शेंदुर्णी उप बाजार समितीमध्ये येऊन शेतकरी व व्यापारी यांचे म्हणणे ऐकून तोडगा काढला लगेच मका खरेदी ला लीलाव पद्धतीने सुरुवात होऊन शेतकऱ्यांना आठशे ते साडे पंधराशे पर्यंत भावाने मका खरेदी करण्यात आला.

यावेळी बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी बोलताना सांगितले की शेतकऱ्यांचे अति पावसामुळे खूप नुकसान झाले असून शेतकरी ही हवालदील झालेला आहे त्यामुळे मक्का पिकाची क्वालिटी कमी जास्त असू शकते तरी व्यापाऱ्यांनीही एकदम पडून भाव न मागता शेतकऱ्यांना परवडेल अशा भावात खरेदी करावा तसेच व्यापारी व शेतकरी यांनी सामांजस्यपणा भूमिका घेऊन आपला माल खरेदी विक्री करावा काही समस्या असल्यास बाजार समिती आपणास सहकार्य करेल, असे आवाहन केले.

यावेळी बाजार समितीचे संचालक राजमल भागवत, संजय देशमुख ,अशोक भोईटे सुनील कलाल , शिवाजी पाटील, सचिव प्रसाद पाटील यांनीही शेतकरी व व्यापारी वर्गामध्ये मध्यस्थी केली. शेंदुर्णी उप बाजार समितीमध्ये लिलाव पद्धतीने मका खरेदीला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन समाधान व्यक्त केले.

शासकीय मका खरेदीस नाव नोंदणीचे अहवाल

शासनातर्फे मक्का खरेदी करण्यास लवकरच प्रारंभ होणार असून त्या अगोदरच शेंदुर्णी जिनिंग प्रेस सोसायटीमध्ये नोंदणी सुरू झाली असून शेतकऱ्यांनी शासकीय हमीभावाचा लाभ घ्यावा तसेच शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा व शेंदुर्णी उप बाजार समितीमध्ये अधिक गोडाऊन उपलब्ध होण्यासाठी बाजार समितीचे प्रयत्न सुरू असल्याचे संचालक राजमल भागवत यांनी सांगितले.

याप्रसंगी शेतकरी जितेंद्र गरुड, गोपाल गुजर, प्रकाश कोळी, गोविंद गुजर, प्रकाश परदेशी, पंकज बाविस्कर, प्रशांत धनगर, महेंद्र पाटील, प्रभाकर पाटिल, मयूर माळी, शिवाजी पाटील आदींसह असंख्य शेतकरी उपस्थित होते. व्यापारी वर्गातर्फे संतोष जैन उमाकांत भगत, किशोर वाघ, गोटू अग्रवाल, नंदू बारी, भगवान चौधरी आदी व्यापाऱ्यांनी लिलाव खरेदी सहभाग घेतला.

शेतकऱ्यातर्फे देण्यात आले होते निवेदन


शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा व बाजार समितीतर्फे विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या, अशा आशयाचे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---