---Advertisement---
जळगाव : शहरासह जिल्हयात चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अशात चोरीच्या संशयावरून चार जणांना नागरिकांनी चोप दिल्याची घटना समोर आली आहे.
जिल्ह्यातील बोदवडमध्ये नकली नोटांची तस्करी व चोरीच्या संशयावरून चार जणांना नागरिकांनी चांगलाच चोप दिला. चारही संशयित मध्य प्रदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच नागरिकांच्या संतप्त भूमिकेमुळे एक संशयित गाडी घेऊन फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत चारही संशयतांना ताब्यात घेतले आहे. संशयिकांकडे काही नोटांचे बंडल असल्याने नकली नोटांची तस्करी की चोरीचा प्रकार याबाबत पोलिसांकडून शोध सुरू आहे.
जळगावच्या बोदवडमध्ये नकली नोटांची तस्करी व चोरीच्या संशयावरून चार जणांना नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे. चारही संशयित मध्य प्रदेशातील असल्याची माहिती आहे.
नागरिकांच्या संतप्त भूमिकेमुळे एक संशयित गाडी घेऊन फरार झाला असून घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चारही संशयतांना ताब्यात घेतले आहे. संशयिकांकडे काही नोटांचे बंडल असल्याने नकली नोटांची तस्करी की चोरीचा प्रकार याबाबत पोलिसांकडून शोध सुरू आहे.









