---Advertisement---
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळा हनुमान मंदिर समोरील भाजी मार्केटजवळील आदर्श पॅकेजिंग दुकानाच्या मागे काही इसम अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याच्या प्रयत्न करीत होते. त्याचवेळी रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पाच जणांना अटक केली.
त्यानंतर याच गुन्ह्याच्या तपासात बुधवारी (ता.३) मोहम्मद दाऊदी (वय २४, रा. आझादनगर, खडका रोड, भुसावळ), हर्षल कापडे (वय २३), प्रवीण पवार (वय २४, रा. शिवाजीनगर, भुसावळ) या तिघांना भुसावळातून अटक केली. इतर दोघांचा तपास सुरू आहे.
दरम्यान या तीघांकडून तीन गावठी कट्टयासह पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात २२ ते २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली. या प्रकरणांमध्ये पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून या संशयित आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.








