---Advertisement---
जळगाव : गेल्या पाच दिवसांपासून चढ-उतार होत असलेल्या चांदीच्या भावात दोन हजार २०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ८२ हजार रुपयांवर पोहचली आहे. सोन्याच्या भावात मात्र ६०० रुपयांची घसरण होऊन ते एक लाख २८ हजार २०० रुपयांवर आले आहे.
१ डिसेंबर रोजी एक लाख २९ हजार २०० रुपयांवर दररोज चढ-उतार होत सोने ५ डिसेंबरपर्यंत ते एक लाख २८ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहचले. ६ रोजी त्यात ६०० रुपयांची घसरण होऊन सोने एक लाख २८ हजार २०० रुपये प्रति टोळ्यावर आले.
अर्थात चांदीच्या भावात दोन हजार २०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ८२ हजार रुपयांवर पोहचली आहे. सोन्याच्या भावात मात्र ६०० रुपयांची घसरण होऊन ते एक लाख २८ हजार २०० रुपयांवर आले आहे.
६ डिसेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव ५४० रुपयांनी कमी होऊन १,३०,१५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला, तर १०० ग्रॅमचा भाव ५,४०० रुपयांनी कमी होऊन १३,०१,५०० रुपये झाला. ८ ग्रॅम सोन्याचा भावही ४३२ रुपयांनी कमी होऊन १,०४,१२० रुपये झाला आणि १ ग्रॅम सोन्याचा भाव ५४ रुपयांनी कमी होऊन १३,०१५ रुपये झाला. २२ कॅरेट सोन्यामध्ये १० ग्रॅमचा भाव ५०० रुपयांनी कमी होऊन १,१९,३०० रुपये झाला आणि १०० ग्रॅमचा भाव ५,००० रुपयांनी कमी होऊन ११,९३,००० रुपये झाला.
दरम्यान, ८ ग्रॅम आणि १ ग्रॅम सोन्याच्या भावातही घट झाली, अनुक्रमे ४०० रुपयांनी आणि ५० रुपयांनी कमी होऊन ते ९५,४४० रुपये झाले आणि ११,९३० रुपये झाले. याशिवाय, १८ कॅरेट सोन्याचा भाव प्रथम ४१० रुपयांनी घसरून ९७,६१० रुपये प्रति १० ग्रॅम झाला, नंतर ४,१०० रुपयांनी घसरून ९,७६,१०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला, नंतर ३२८ रुपयांनी घसरून ७८,०८८ रुपये प्रति ८ ग्रॅम झाला आणि शेवटी ४१ रुपयांनी घसरून ९,७६१ रुपये प्रति १ ग्रॅम झाला.









