सेंट अलॉयसियस हायस्कूल प्रकरण; अखेर गुन्हा दाखल

---Advertisement---

 

भुसावळ, प्रतीनीधी : ख्रिश्चन अल्पसंख्याक संस्थेच्या सेंट अलॉयसियस हायस्कूलमध्ये (दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी) घडलेल्या प्रकरणी अखेर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

पंचायत समिती भुसावळचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी किशोर नामदेव वायकोळे (५४) यांनी ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिली. यापूर्वी दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजीच भाजपाचे राज्य परिषद सदस्य प्रमोद वामन सावकारे यांच्यासह इतर हिंदू संघटनांनी उपविभागीय अधिकारी, भुसावळ व शिक्षण विभागाकडे याबाबत लेखी तक्रार दाखल केली होती.

त्रिस्तरीय चौकशी समितीचा अहवाल ठळक ठपका जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जळगाव यांनी नेमलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीने २६ सप्टेंबर २०२५ रोजी १६ पानी अहवाल सादर केला. अहवालातील प्रमुख निष्कर्ष ”पालकांची लेखी संमती केवळ “सहल” साठी घेण्यात आली होती; धार्मिक स्थळी प्रार्थना, उपदेश, स्कार्फ घालणे, विशिष्ट पुस्तक वाटप याबाबत कोणताही उल्लेख नव्हता.विद्यार्थ्यांकडून ₹१०० घेऊन रिक्षा भाडे दिले, परंतु शाळा व्यवस्थापन व विकास समितीचा (SMDC) ठराव व हिशेब सादर झाला नाही.

ऐतिहासिक किंवा शैक्षणिक स्थळाऐवजी केवळ धार्मिक स्थळांनाच भेट; भारत स्काऊट्स अँड गाईड्सच्या नियमांचा भंग. मुलींना मशिदीत डोके झाकण्यास भाग पाडणे व “इस्लाम आतंक नव्हे आदर्श” पुस्तकाचे वाटप हे एकाच धर्माला प्राधान्य देणारे व धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला हरताळ फासणारे कृत्य. मुख्याध्यापक व शिक्षकांच्या जबानीत गंभीर विरोधाभास. शिक्षण हक्क कायदा २००९ (RTE) व महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी नियम १९८१ (MEPS Rules) यांचे उल्लंघन. गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपी शिला मॅडम – मुख्याध्यापिका (अनुदानित), अमोल वांदळे उपशिक्षक (अनुदानित), शेख इरफान उपशिक्षक (अनुदानित), बर्नार्ड मॉरिस उपशिक्षक (अनुदानित), मिशेल फर्नांडिस उपशिक्षिका (अनुदानित) आफरीन खान शिक्षणसेविका (अनधिकृत/मान्यताप्राप्त नाही) ,कौलीन कौर – शिक्षणसेविका (अनधिकृत/मान्यताप्राप्त नाही), गुरजीतसिंग पदम खाजगी संगणक शिक्षक भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, लवकरच आरोपी शिक्षक व मुख्याध्यापिकांची चौकशी होणार आहे.

समाजाची प्रतिक्रिया

काही हिंदू संघटना व पालकांनी ही कारवाई स्वागतार्ह असल्याचे सांगितले असून, धर्मनिरपेक्षतेच्या नावावर एकाच धर्माचा प्रचार करणाऱ्या उपक्रमांवर कडक निर्बंध घालावेत, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे शाळा प्रशासनाने हा उपक्रम केवळ सर्वधर्मसमभाव शिकवण्यासाठी होता, कोणताही दुर्भावनापूर्ण हेतू नव्हता, असा बचाव केला होता; परंतु चौकशी समितीचा अहवाल व पोलिसांत दाखल FIRमुळे शाळेची बाजू कमकुवत मानली जात आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---