दुर्दैवी! पाय घसरला अन् नाल्यात बुडून दोन चिमुकल्यांचा अंत; जळगाव जिल्ह्यातील घटना

---Advertisement---

 

जळगाव : शाळे लगत असलेल्या नाल्यात पाय घसरून पडल्याने दोन चिमुकल्यांचा अंत झाला. ही दुदैवी घटना मंगळवार, दि. १६ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास भडगावातील आदर्श कन्या विद्यालयाच्या इंग्लिश मीडियम नर्सरीत शाळेत घडली. अंश सागर तहसीलदार (वय ३ वर्षे ६ महिने) , मयंक ज्ञानेश्वर वाघ (वय ४ वर्षे) असे मृत बालकांची नावे आहेत.

शाळेच्या परिसराला संरक्षण देणारी भिंत पुराच्या पाण्यामुळे कोसळली होती. दरम्यान, नाल्याजवळ असलेल्या बाथरूममध्ये गेलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा पाय घसरून त्या नाल्यात पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर दोघांना तातडीने भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; डॉक्टरांनी तपासणी अंती मृत घोषित केले. यावेळी पालकांनी काळीज चिरणारा आक्रोश केला.

शाळेच्या हलगर्जीपणामुळे दुर्घटना


शाळा प्रशासनाच्या भोंगळ व दुर्लक्षित कारभारामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला असून, घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---