जळगाव महापालिकेसाठी मंगेश चव्हाण निवडणूक प्रभारी, तर आमदार सुरेश भोळे यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती

---Advertisement---

 

जळगाव : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रदेश भाजपने चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती करून धक्कातंत्राचा वापर केला आहे. दरम्यान या नव्या नियुक्तीचा भाजपला मोठा फायदा होईल अशी शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.

भारतीय जनता पार्टी हा पक्ष धक्कातंत्राचा वापर करण्यात माहीर आहे. विशेषतः नियुक्त्यांच्या संदर्भात माजपकडून नेहमीच अशा तंत्राचा वापर करून राजकारणात उलथापालथ घडविली जाते.

पालिका निवडणुकांआधी भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्ह्यावे प्रभारीपदी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची नियुक्ती करण्यात आली होती. यासोबतच जळगावचे निवडणूक प्रमुख म्हणून आमदार सुरेश भोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आता महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. अशातच प्रदेश भाजपने धक्कातंत्राचा बापर करून चाळीसगावचे आक्रमक आमदार मंगेश चव्हाण यांची निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने ही नियुक्ती झाली आहे.

मनपावरही मिळविणार नियंत्रण


जळगाव जिल्हा बँक आणि जिल्हा दूध संघ याठिकाणी सलांतरात आमदार मंगेश चव्हाण यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. राजकीय गणिते जुळवून या दोन्ही सहकारी संस्थांवर आमदार मंगेश चव्हाण यांनी भाजपचे नियंत्रण प्रस्थापित केले आहे. त्यामुळे आता महापालिकेत देखीत हा पॅटर्न राबवून भाजपचा विजयरय दौडणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---