---Advertisement---
जळगाव : जिल्हयात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर संशयिताने वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार कुणाला सांगितल्यास आई-वडिलांना जिवे मारण्याचा दम पीडितेला भरला. हा संतापजनक प्रकार तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरात उघडकीस आला आहे.
पीडितेने पोलिसात कैफियत मांडल्यानंतर हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. सहा महिन्यापूर्वी ते २० सप्टेंबर २०२५ दरम्यान पीडितेच्या घरी संशयित वेळोवेळी आला. तिच्या इच्छेविरुध्द त्याने जबरीने तिच्यावर अत्याचार केला.
हा प्रकार सांगितल्यास तुझ्या-आई वडिलांना जिवे ठार मारेल, असे त्याने पीडितेला धमकाविले. मात्र हा अत्याचार असह्य झाल्याने पीडितेने प्रकार सांगितला. त्यानुसार शुक्रवारी (१९ डिसेंबर) तालुका पोलीस ठाण्यात मुकेश साकेत (रा. दमोय, जि. उमरीया म.प्र.) याच्या विरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी घटनास्थळी जावुन प्रकार जाणुन घेतला. कुटुंबियांशीही संवाद साधला. सहायक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे हे तपास करीत आहेत.








