सोने नव्हे चांदी ठरली सोन्यावाणी, ‘जीएसटी’सह अडीच लाख पार…

---Advertisement---

 

जळगाव : जळगाव सुवर्णपेठेत चांदीच्या भावात एकाच दिवसात थेट १४ हजार ५०० रुपयांची वाढ झाली हे. त्यामुळे चांदी दोन लाख ४७ हजार रुपयांवर पोहोचली आहे. तर सोन्याच्या भावात एक हजार ४०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख ३९ हजार ७०० रुपयांवर पोहोचले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भाववाढ होत असलेली चांदी २५ डिसेंबर रोजी एक दिवस स्थिर राहिली. मात्र, त्यानंतर पुन्हा सलग दोन दिवस त्यात मोठी वाढ नोंदविली गेली.

२६ रोजी १० हजार ५०० रुपयांची वाढ होऊन दोन लाख ३२ हजार ५०० रुपयांवर पोहोचलेल्या चांदीच्या भावात २७ रोजी पुन्हा १४ हजार ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी दोन लाख ४७हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. जीएसटीसह आता चांदी दोन लाख ५४ हजार ४१० रुपयांवर पोहोचली आहे.

एकीकडे चांदीचा तुटवडा व दुसरीकडे जागतिक पातळीवर मागणी वाढत असल्याने तिच्या भावात वाढ होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

गेल्या आठवड्याची तुलना पाहता आठवडाभरात चांदी ४२ हजार ५०० रुपयांनी वधारली आहे. २० डिसेंबर रोजी चांदी दोन लाख चार हजार ५०० रुपयांवर होती. ती २७ रोजी दोन लाख ४७हजार रुपये झाली आहे. यात २६ व २७या दोन दिवसांत २५ हजार रुपयांची वाढ आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---