---Advertisement---
जळगाव : जिल्हयात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून, त्यासोबतच हवेतील धुळीचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीएमसी) बाह्यरुग्ण विभागात दमा, सांधेदुखी, सर्दी-खोकला तसेच त्वचारोगाच्या रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणत वाढली आहे.
परिणामी दररोज ओपीडीतील रुग्णसंख्या १५०० च्या पुढे गेली आहे. त्यामुळे काळजी घेण्याची अत्यंत गरज असून, नेमकी काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात जाणून घेऊयात.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या थंडीमुळे रक्तवाहिन्या आंकुचन पावत असल्याने संधेदुखीचा त्रास वाढत असून, हवेतील धूळ व गारठ्यामुळे श्वसनमार्गाशी संबंधित आजार, दमा, घशाचे संसर्ग तसेच ऍलर्जीजन्य त्वचारोग बळावत आहेत. विशेषतः वयोवृद्ध, लहान मुले आणि आधीच श्वसनविकार असयेये रुग्ण अधिक त्रस्त होत असल्याने डॉक्टरांनी सांगितले.
सध्या जिल्हयात तापमान ६.७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून, हवेचा वेग वाढल्याने गारठा अधिक जाणवत आहे. त्यामुळे सकाळी व रात्रीच्या वेळी आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे.
काय काळजी घ्याल?
दरम्यान, डॉक्टरांनी नागरिकांना काळजी घेणायचे आवाहन केले आहे. शरीर व सांधे उबदार ठेवावेत, गरम कपड्यांचा वापर करावा, हलका व नियमित व्यायाम करावा तसेच दुखत असलेल्या सांध्यांना गरम पाण्याचा शेक द्यावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
दमा व श्वसनविकार टाळण्यासाठी मास्कचा वापर करावा, धुळीच्या वातावरणात जाणे टाळावे आणि सकाळी कोमट पाणी प्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.









