---Advertisement---
जळगाव : भाजप आणि शिंदेसेना यांच्यात युती होईल की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. याआधीच शिंदेसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे गटाच्या पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, भाजप-शिवसेनेची युती निश्चित असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली.
जळगावात युतीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात चर्चा होत आहे. मात्र, जागावाटपावरून अद्याप दोन्ही पक्षांत एकमत झालेले नाही. शिंदे गटाने दिलेला जागांचा प्रस्ताव भाजपला मान्य नसल्याचे सांगितले जात आहे.
याआधीच शिंदेसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवार संतोष पाटील, सागर सोनवणे, विष्णू भंगाळे, पायल दारकुंडे उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान, भाजप – शिवसेनेची युती निश्चित असून 50/25 जागांवर फॉर्मुला ठरलेला असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली. 25 जागांवर शिवसेना शिंदे गट ठाम असल्याचेही किशोर पाटील यांनी म्हटले.
तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जागांबाबत अद्याप निश्चित नसले तरी भाजपच्या कोट्यातून राष्ट्रवादी अजित पवार गटाला जागा दिली जाणार असल्याचेही संकेत किशोर पाटील यांनी दिले आहे.









