---Advertisement---
आपल्या रोजच्या जेवणात घरगुती वापरात येणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत असून सर्वसामान्यांच्या घरातील किचनचं बजेट मात्र कोलमडल्याच चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना चांगलाच फटका बसत आहे.
रोजच्या जेवणात वापरात असलेल्या सोयाबीन, पामतेल, सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवण्यात आली आहे.
सद्यस्थितीत कोणत्या तेलाचे दर किती आहेत….. जाणून घेऊया ⬇️
सोयाबीन तेल १४२ ते १४४ रु. प्रतिकिलो
शेंगदाणा तेल २०५ रु. प्रतिकिलो
पामतेल १३२ वरून १३७ रु. प्रतिकिलो
सूर्यफूल तेल १६० वरून १७२ रु. प्रतिकिलो
तीळ तेल २६० रुपयांवर स्थिर आहे.
आपण जर पाहिलं तर साधारणतः गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सोयाबीन तेलाच्या भावामध्ये वाढ झाली नव्हती तर अन्य खाद्य तेलाच्या भावात किरकोळ चढ-उतार सुरू होती. मात्र मागच्या काही दिवसात खाद्यतेलात वाढ झाली.
खाद्यतेलांच्या दरवाढीचे नेमके कारण काय ?
अवकाळी पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान, सोयाबीनच्या आधारभूत किमतीत केलेली वाढ व अमेरिकन डॉलरच्या दरात होणारी वाढ अशा वेगवेगळ्या कारणांनी खाद्यतेलाच्या भावात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
तसेच खाद्य तेल दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलांच्या किमतीत झालेली वाढ, आयात शुल्क व वाहतूक खर्चात वाढ ही प्रमुख कारणे आहेत. याशिवाय देशांतर्गत उत्पादन घटणे, हवामानातील बदलामुळे तेलबियांचे नुकसान, तसेच साठेबाजी आणि वाढती मागणी यामुळेही बाजारात तुटवडा निर्माण होऊन खाद्य तेलांचे दर वाढले आहेत.









