---Advertisement---
शिवसेना उबाठा पक्षात संघटनात्मक पातळीवर मोठी घडामोड समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ग्रामीण जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे ग्रामीण जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ग्रामीण जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा सादर केला आहे. या पत्रात त्यांनी गेल्या ३० वर्षांच्या शिवसेनेतील प्रवासाचा उल्लेख करत, पक्षाने दिलेल्या प्रत्येक जबाबदारीला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचं नमूद केलं आहे. तसेच, जिल्ह्यातील संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडताना, कौटुंबिक व राजकीय अडचणींमुळे आता माझा राजीनामा देत असल्याचं त्यांनी नमूद केला आहे. तसंच माझा राजीनामा स्वीकारून मला पदमुक्त करावे अशी ही विनंती त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे.
या राजीनाम्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत बदल होण्याची शक्यता असून, पुढील जिल्हाप्रमुख कोण असणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.









