थंडी कमी, ढग जास्त – बदलत्या हवामानाचा परिणाम!

---Advertisement---

 

जळगावसह राज्यात सध्या हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे.

ढगाळ वातावरणामुळे थंडीचा कडाका काहीसा गायब झाला असून, गारठ्याची तीव्रता कमी झाल्याचे चित्र आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रचंड थंडी असली, तरी महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे शीतलहरी न आल्याने तापमान तुलनेत जास्त राहिले आहे. दरम्यान, आज जळगावसह राज्यातील काही भागात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहर आणि जिल्ह्यात वातावरणात सतत बदल होत आहेत.

जानेवारीच्या सुरुवातीला जाणवणारी कडाक्याची थंडी आता काहीशी कमी झाली असली, तरी बुधवार २१ जानेवारी रोजी जळगावात वेगळेच चित्र दिसून आले. सकाळपासूनच दाट धुके आणि ढगाळ वातावरण पसरले होते. त्यामुळे दिवसा देखील गारवा जाणवत होता.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, आगामी काही दिवस जळगाव शहर आणि जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्याच्या काही भागात किरकोळ पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. ढगाळ वातावरणामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखले गेल्याने, रात्रीच्या किमान तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे.

आगामी पाच दिवसांचे तापमान आणि हवामान स्थिती अशी राहण्याची शक्यता आहे—

२२ जानेवारी : रात्रीचे तापमान १३ अंश, सकाळी धुके, दुपारपर्यंत काही अंशी ढगाळ वातावरण.

२३ जानेवारी : १४ अंश, ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता.

२४ जानेवारी : ११ अंश, कोरडे वातावरण.

२५ जानेवारी : १२ अंश, काही अंशी ढगाळ वातावरण.

२६ जानेवारी : १३ अंश, ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता.

बदलत्या हवामानामुळे रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने, शेतकऱ्यांनी योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---