---Advertisement---
‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ स्पर्धा भारतामध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेली UCI मान्यताप्राप्त (2.2 श्रेणीतील) आंतरराष्ट्रीय बहु-टप्पा सायकल स्पर्धा सध्या पुणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात सुरू आहे. या जागतिक दर्जाच्या स्पर्धेच्या पुणे-हवेली-पीसीएमसी या चौथ्या टप्प्याचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार व केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री मा. श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते पार पडला.
सदर स्पर्धेच्या ३५ पेक्षा अधिक देशांतील, २९ आंतरराष्ट्रीय संघांचे, १७० हून अधिक व्यावसायिक सायकलपटू आपल्या वेग, तंत्र, सहनशक्ती आणि खिलाडूवृत्तीचे अप्रतिम प्रदर्शन करत आहेत. सदर स्पर्धा १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान पार पडणारी असून, पुणे, पिंपरी-चिंचवड, मुळशी, मावळ, पुरंदर, बारामती अशा विविध भागांतून जात आहे. पुणे जिल्ह्याची नैसर्गिक, सांस्कृतिक व क्रीडात्मक ओळख जागतिक स्तरावर अधोरेखित करत आहे.
बजाज ऑटो या स्पर्धेचा टायटल स्पॉन्सर असून, ही स्पर्धा भारतातील सायकलिंग क्रीडेला नवी दिशा देणारी, तरुणांना प्रेरणा देणारी आणि भारताला जागतिक क्रीडा नकाशावर ठळकपणे मांडणारी ऐतिहासिक घटना ठरत आहे.
जागतिक पातळीवरील खेळाडूंना एकत्र आणून क्रीडा पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. भारत क्रीडा पर्यटनाचे केंद्र म्हणून पुढे येत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी शुभारंभ दरम्यान काढले.
यावेळी उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार व केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री मा. श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह प्रसिद्ध सिनेअभिनेते आमिर खान, राज्यसभा खासदार श्रीमती मेधा कुलकर्णी, इ. प्रमुख उपस्थितीत होते.









