---Advertisement---
सध्या सायबर गुन्हेगार दररोज वेगवेगळ्या मार्गांनी सर्वसामान्य नागरिकांना लुटत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना घडली आहे ती म्हणजे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील एका 69 वर्षीय निवृत्त शिक्षकाला झोपेत एक क्लिक करणं महागात पडलं असून सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 7 लाख 89 हजार 9 हजार 992 रुपये हे लंपास केले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील आदर्श हायस्कूलचे निवृत्त शिक्षक माधवदास शुगानी हे 5 सप्टेंबर रोजी आजारी होते व त्यांनी त्यांची प्रकृती ठीक नसल्याने औषधांची यादी शोधून डाऊनलोड करत असताना चुकून एका अज्ञात लिंकवर टच केले. मात्र त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी ती लिंक डिलीट केली आणि ते पुन्हा झोपून गेले त्यानंतर सतत त्यांची तब्येत ही पुढील काही दिवस अस्वस्थ असल्यामुळे त्यांनी त्यांचा मोबाईल हा तपासला नाही.
मात्र 15 सप्टेंबर रोजी जेव्हा माधवदास शुगानी यांनी त्यांच्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यातील बॅलन्स चेक केलं. त्यावेळेस त्यांना धक्का बसला त्यांच्या बँक खात्यातील अंदाजे 7 लाख 89 हजार 992 रुपये एवढी रक्कम ही गायब झालेली दिसली विशेष म्हणजे ही रक्कम काढत असताना त्यांना कोणताही ओटीपी किंवा त्यांनी कोणालाही गोपनीय माहिती दिली नाही. मात्र चोरट्यांनी या 10 ते 12 दिवसांच्या कालावधीत त्यांच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्यांनी एवढी रक्कम काढून घेतली आहे.
माधवदास शुगाणी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जळगाव सायबर पोलीस ठाणे गाठून त्या ठिकाणी तक्रार दिली व याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत पुढील तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.









