---Advertisement---
अटारी–वाघा बॉर्डर पंजाब | राष्ट्रीय मतदार दिन निमित्त तसेच युवकांमध्ये आरोग्य, फिटनेस व लोकशाही मूल्यांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या पुढाकाराने #SundaysOnCycle या विशेष सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष शोभा लाभली. आपल्या भाषणात त्यांनी नागरिकांनी शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. “फिट भारत व जागरूक मतदार हे सशक्त राष्ट्राचे दोन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
सदर कार्यक्रमास डॉ. अतुल फुलझेले (IPS, IG – BSF पंजाब फ्रंटियर), आंतरराष्ट्रीय बॉक्सर निकहत झरीन, अभिनेते विवेक दहिया, रागिणी द्विवेदी, भारतीय क्रिकेटपटू सिद्धार्थ कौल, तसेच दीपक मिश्रा, अनिक राहेजा, गरिमा गोयल, आशिता दत्ता, नामिता सचदेवा आणि श्रीमती वर्षा बावा (अध्यक्ष, पंजाब युनिट – IRSF) यांची उपस्थिती लाभली.
#SundaysOnCycle हा उपक्रम युवकांना सायकलिंगद्वारे नियमित व्यायामाची सवय लावणे, पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करणे आणि सामाजिक संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे या उद्देशाने देशभर राबविण्यात येत आहे. यावर्षी हा उपक्रम राष्ट्रीय मतदार दिनाशी जोडून “आरोग्यासाठी पेडलिंग, लोकशाहीसाठी मतदान” हा प्रभावी संदेश देण्यात आला.
या सायकल रॅलीमध्ये युवक, नागरिक, सुरक्षा दलांचे जवान व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमातून “प्रत्येक पेडल महत्त्वाचे आहे आणि प्रत्येक मत अमूल्य आहे” हा संदेश देत नागरिकांना फिटनेस व मतदान बाबत जागरूक करण्यात आले. सदर कार्यक्रमाने फिट इंडिया, लोकशाहीची जाणीव आणि राष्ट्रनिर्मितीतील नागरिकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले असून सहभागी सर्व स्तरांतून यास मोठा प्रतिसाद मिळाला.









