जी एस ग्राउंडवर शिवजयंतीनिमित्त भव्य शस्त्र प्रदर्शनीला मंत्री संजय सावकारे यांची भेट

---Advertisement---

 

आज शिवजयंतीनिमित्त जी एस ग्राउंड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्र पूजनाचा आणि ऐतिहासिक शस्त्रांच्या भव्य प्रदर्शनीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विविध प्रकारची तलवारी, ढाली, भाले आणि ऐतिहासिक शस्त्रांचे आकर्षक प्रदर्शन यावेळी पाहायला मिळाले.
या कार्यक्रमाला राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी भेट देत प्रदर्शनीची पाहणी केली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच शस्त्र पूजन विधीत सहभाग घेतला.

यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री संजय सावकारे म्हणाले की,
“छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना शौर्य, पराक्रम आणि दूरदृष्टीचे अद्वितीय उदाहरण घालून दिले. आजच्या तरुण पिढीने महाराजांचा इतिहास जाणून घेत त्यांच्या विचारांवर चालणे आवश्यक आहे. अशा प्रदर्शनीमुळे युवकांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण होते आणि स्वाभिमानाची भावना बळकट होते.”

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---