जळगाव शहरात रंगणार ‘खान्देश महोत्सव ; महिला बचत गटांना मिळणार हक्काची बाजारपेठ

---Advertisement---

 

जळगाव स्थानिक महिला बचत गट, उद्योजक आणि स्वयंसहाय्यता गटांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिका व महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खान्देश महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव २६ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत सागर पार्क येथे पार पडणार आहे.
महोत्सवाचे हे सहावे वर्ष असून, याबाबतची माहिती महापौर दीपमाळा काळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
   महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये
खान्देशातील संस्कृती, खाद्यपरंपरा आणि हस्तकलेचे दर्शन या महोत्सवातून घडणार आहे. एकूण १८० स्टॉल्स उभारण्यात येणार असून त्यामध्ये –
महिला बचत गटांच्या हस्तकला वस्तू
होम व किचन अप्लायन्सेस
इलेक्ट्रॉनिक ज्वेलरी व सौंदर्यप्रसाधने
ऑफिस व होम डेकोरेटिव्ह साहित्य
खान्देशी पद्धतीचे शाकाहारी व मांसाहारी अस्सल खाद्यपदार्थ
यांचा समावेश असणार आहे.
 मनोरंजनाची मेजवानी
महोत्सवात खरेदीसोबतच मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध अभिनेता ओम जाधव यांच्या उपस्थितीत महिलांसाठी ‘पैठणी, राणीहार आणि आकर्षक भेटवस्तू’ जिंकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
तसेच गायकांचे सादरीकरण, समूह नृत्य, स्थानिक कलावंतांचे कार्यक्रम यांचा समावेश असेल. लहान मुलांसाठी खास गेम झोन आणि जादूगाराचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. उत्कृष्ट स्टॉलधारकांचा गौरव तसेच मिक्सर, टोस्टर यांसारख्या उपयुक्त वस्तूंचे बक्षीस वितरणही होणार आहे.
  प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश
या वर्षी महोत्सवात प्लॅस्टिकमुक्ती ही विशेष थीम ठेवण्यात आली आहे. नागरिकांना कापडी पिशव्या देण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती उपमहापौर मनोज चौधरी यांनी दिली.
महापौर दीपमाला काळे यांनी जळगावकरांना आवाहन केले आहे की, कुटुंबासह महोत्सवाला भेट देऊन स्थानिक महिला बचत गटांच्या उत्पादनांना खरेदीद्वारे पाठबळ द्यावे.
या खानदेश महोत्सव 2026 मुळे स्थानिक महिलांना आर्थिक बळ मिळणार असून जळगावकरांसाठी खरेदी व मनोरंजनाची दुहेरी परभणीत ठरणार आहे.
वेळापत्रक
कालावधी : २६ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६
वेळ : सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत
स्थळ : बॅं. निकम चौक, सागर पार्क, जळगाव

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---