ऐन लग्नसराईत दागिने तयार करण्याचे काम थांबले; गॅस सिलेंडर तुटवड्याचा सुवर्ण व्यवसायाला फटका….!

---Advertisement---

 

अमेरिका, इजराइल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता विविध उद्योगांवर दिसू लागला असून सुवर्ण व्यवसायालाही त्याचा मोठा फटका बसत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा रखडल्यामुळे दागिने तयार करणाऱ्या सुवर्ण कारागिरांचे काम जवळपास ठप्प झाले आहे.

सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी गॅस सिलेंडर अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. सोने वितळवण्यापासून ते त्यावर प्रक्रिया करून दागिने घडवण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी सिलेंडरची गरज भासते. मात्र सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी सुवर्ण कारागिरांचे काम थांबले आहे.

विशेष म्हणजे सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असताना दागिन्यांची मागणी वाढलेली असते. मात्र सिलेंडरच्या तुटवड्यामुळे दागिने तयार करण्याचे काम वेळेत पूर्ण करता येत नसल्याने कारागिरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक सुवर्ण कारागिरांनी काम थांबवावे लागल्याने त्यांच्या रोजीरोटीवरही परिणाम होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

सिलेंडरचा पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही, तर याचा मोठा परिणाम सुवर्ण उद्योगावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. व्यापाऱ्यांसोबतच कारागिरांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---