‘वंदे भारत’ एक्सप्रेसमध्ये किळसवाणा प्रकार! दही-डाळीत अळ्या; प्रवाशांचा संताप, IRCTC वर मोठी कारवाई…!

---Advertisement---

 

प्रीमियम सुविधा देणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्सप्रेसमध्ये पुन्हा एकदा गंभीर प्रकार समोर आला असून, प्रवाशांना देण्यात आलेल्या जेवणात अळ्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा ते टाटानगर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेकडून देण्यात आलेल्या जेवणात हा धक्कादायक प्रकार समोर आला. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, दही आणि डाळीत जिवंत अळ्या दिसून आल्याने सर्वांनाच किळस वाटली. सुरुवातीला काहींना यावर विश्वास बसला नाही, मात्र प्रत्यक्ष पाहिल्यानंतर प्रवाशांनी संताप व्यक्त केला.


या प्रकाराची तक्रार पँट्री कर्मचाऱ्यांकडे करण्यात आली असता सुरुवातीला टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप प्रवाशांनी केला. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर प्रवाशांनी थेट रेल्वे प्रशासनाकडे तक्रार नोंदवली.

घटना समोर येताच भारतीय रेल्वे प्रशासनाने तात्काळ कारवाई करत IRCTC वर 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच संबंधित अन्नपुरवठा करणाऱ्या वेंडरवर तब्बल 50 लाख रुपयांचा दंड लावून त्यांची सेवा तत्काळ रद्द करण्यात आली.

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांच्या सुरक्षिततेशी आणि सेवांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलली जातील.

दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, प्रीमियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्सप्रेसमध्येच असा प्रकार घडल्याने “मग प्रीमियम सेवा नेमकी कशासाठी?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---