व्यावसायिकाला ४८ कोटींची खंडणी मागुन धमकी, सावकारीच्या कटात ३५ जणांवर जळगावात गुन्हा दाखल

---Advertisement---

 

जळगाव : सावकारीचा परवाना नसताना संशयितांनी एकमेकांच्या मदतीने व्याजाने कर्ज दिले. या कर्जाच्या परतफेडीतून ७२ कोटी रुपयांची परतफेड. त्यानंतर ४८ कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली. ही रक्कम न दिल्यास समाजात बदनामी करण्याची आणि जिवे मारण्याची धमकी पुणे येथील व्यावसायिकाला दिल्याचा धक्कादायक मामला समोर आला आहे. याप्रकरणी हरियाणातील ३५ जणांवर जळगाव येथे रामानंदनगर पोलीस ठाण्यात खंडणी तसेच सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दीपक सुरेशचंद संघवी (वय ४८, रा. मधुकर बंगलो, पॅनकार्ड क्रुब एरिया, बाणेर, पुणे) हे निलॉन्स एंटरप्रायझेसस कंपनीत संचालक आहेत. संघवी यांच्या तक्रारीनुसार, संशयितांनी त्यांच्याशी संपर्क साधला. १ नोव्हेबार २०२२ ते २५ मार्च २६ दरम्यान शहरात महाबळ कॉलनीत संशयितांनी एकमेकांच्या मदतीने संघवी यांना ५८ कोटी रुपये व्याजाने दिले होते. या रक्कमेला अव्वाच्या सव्वा दराने व्याज वसुल करत संघवी यांच्या कडून व्याजापोटी संशयितांनी ७२ कोटी रुपये घेतले. आणखी ४८ कोटी रक्कमेची खंडणी मागितली.
ही रक्कम न दिल्यास कुंटुबांला जिवे ठार मारण्याची तसेच व्यवसाय बंड पाडुन समाजात बदनामी करु, अशी त्यांना धमकी दिली.

दीपक संघवी यांच्या तक्रारीनुसार याप्रकरणी अमित गुप्ता, दीकरॉय, दिनेश अहलावत, भरपुरसिंग, उज्वल कटारिया, संदीप गिल, संदीप अहलावत, संतकुमार, जितेंद्रसिंग, आशिष देस्वाल, शंकरभाई, साहिल, रिषी, ध्रुव, जगदिश मलिक, अंकुर मलिक, सागर सुहाग, विक्रम, विकास भुपेंद्र, सितेंदर, दिपक, संजय मलिक, सुमित पहेलवान, सुधीर पहेलवान, मोहित पहेल, दिपक (सागरसुहाचा साथीदार), मनदीप, सुंदर, विशाल सेहगल, मोहित अहलावत, सोहित अहलावत, अनिल मलिक, सनी (सर्व रा. रोहतक, हरियाणा) यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात संगनमताने कट रचला.

सावकारीचा कोणताही परवाना नसताना एकमेकांच्या मदतीने तक्रारदार संघवी यांना ५० कोटी रुपये व्याजाने कर्ज दिले. तक्रारदाराकडून ७२ कोटी रुपये घेतले. आणखी ४८ कोटी रुपयांची मागणी केली. ती न दिल्यास कुटुंबाला जिवे मारण्याची, व्यवसाय बंद पाडण्याची आणि समाजात बदनामी करण्याचे धमकाविले म्हणून संशयितांवर भारतीय न्याय संहिता कलम तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम प्रमाणे खंडणी तसेच सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---