---Advertisement---
सरकारी विभागात काम करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. National Highways Authority of India (NHAI) ने समर इंटर्नशिप प्रोग्राम 2026 साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या इंटर्नशिपमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रोजेक्टवर काम करण्याचा अनुभव मिळणार आहे.
या इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 20,000 रुपयांचा स्टायपेंड दिला जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी internshipatnhai.digitalindiacorporation.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2026 निश्चित करण्यात आली आहे.
ही इंटर्नशिप कालावधी दोन महिन्यांचा असेल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना NHAI च्या फील्ड ऑफिस आणि मुख्यालयात काम करण्याची संधी मिळेल, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काम करण्याचा अनुभवही मिळणार आहे.
पात्रता काय?
या समर इंटर्नशिपसाठी विविध शाखांतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगसोबतच कॉम्प्युटर सायन्स, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, डेटा सायन्स, फायनान्स, लॉ, कॉमर्स आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. सिव्हिल इंजिनिअर विद्यार्थ्यांना हायवे डिझाइन आणि ट्रॅफिक प्लॅनिंगवर काम करण्याची संधी मिळेल.
500 विद्यार्थ्यांची निवड
या उपक्रमाअंतर्गत एकूण 500 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. हा उपक्रम उच्च शिक्षण विभाग आणि All India Council for Technical Education (AICTE) यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत आहे.









