होर्मुझनंतर ‘दुसरा’ व्यापारी मार्ग धोक्यात; हुतींचा इशारा, जगाची चिंता वाढली

---Advertisement---

 

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा आणखी एक सागरी मार्ग धोक्यात आला आहे. येमेनमधील हुती बंडखोरांनी बाब al-Mandeb स्ट्राईट हा मार्ग बंद करण्याचा इशारा दिला असून, याला इराण चा पाठिंबा असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आधीच संवेदनशील असलेल्या स्ट्राईट ऑफ हॉरमुझ नंतर आणखी एक मोठा व्यापारी मार्ग संकटात सापडला आहे.


हा महत्त्वाचा समुद्री मार्ग रेड सी ला इंडियन Ocean शी जोडतो आणि पुढे सुईझ कॅनल मार्गे मेडिटेररनीन सी पर्यंत पोहोचतो. जागतिक तेल व व्यापाराच्या सुमारे १२ टक्के वाहतूक या मार्गातून होते, त्यामुळे त्याचे महत्त्व प्रचंड आहे.
हुतींच्या इशाऱ्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाल्यास, जहाजांना आफ्रिकेच्या किनाऱ्याभोवती मोठा फेरा मारावा लागेल, ज्यामुळे १० ते १४ दिवसांचा अतिरिक्त विलंब होऊ शकतो. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार खर्च वाढण्याची आणि तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, सुईझ कॅनल – बाब al-Mandeb स्ट्राईट – स्ट्राईट ऑफ हॉरमुझ हे तीन प्रमुख ‘चोक पॉइंट्स’ मिळून जगातील सुमारे ३० ते ३५ टक्के तेल व व्यापार वाहतूक नियंत्रित करतात. त्यामुळे या भागातील तणाव वाढल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.


या पार्श्वभूमीवर केईर स्टार्मर यांनी प्रमुख देशांची बैठक बोलावली असून, सुमारे ६० देशांनी त्यात सहभाग घेतला. या बैठकीत समुद्री मार्ग खुले ठेवण्यासाठी उपाययोजना आणि ऊर्जा संकट टाळण्यासाठी पर्यायांवर चर्चा करण्यात आली.


एकूणच, मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक व्यापार, ऊर्जा पुरवठा आणि अर्थव्यवस्थेवर मोठे संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---