भाजप आमदाराच्या भावाच्या खुणाचा कट?माजी मंत्री बच्चू कडू वर गुन्हा दाखल,राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ…

---Advertisement---

 

प्रहार जनशक्ती पक्षाचे मुख्य नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर खूनाचा कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे केवळ अमरावतीच नव्हे तर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.


नेमके प्रकरण काय?
​अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे भाऊ अभिजित तायडे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार, बच्चू कडू यांनी एका अपघाताचा बनाव करून आपला खून करण्याचा कट रचला होता, असा खळबळजनक आरोप तायडे यांनी केला आहे. या प्रकरणात शुभम उर्फ गोलू माहौरे याचाही सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


​पोलिसांकडे पुरावे सादर
​तक्रारदाराने केवळ आरोपच केले नसून, त्यासोबत काही महत्त्वाचे पुरावेही पोलिसांना सुपूर्द केले आहेत:
​संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग आणि इतर तांत्रिक पुरावे सादर करण्यात आले आहेत.
​हे पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
​चांदूर बाजार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ५५, ५८ आणि ६१ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---