बाळाच्या जन्मानंतर अल्पवयीन मुलीचा बालविवाह, शिरपूर पोलीसात मुलीचे आई वडील व सासरच्यांवर पोस्कोंतर्गत गुन्हा दाखल

---Advertisement---

 

धुळे : धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह जबरदस्तीने लावून देण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. यात अत्पवयीन मुलीने नुकतेच बाळाला जन्म दिल्यानंतर ही बाब समोर आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात आई वडील व सासरच्या मंडळींवर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यातून धुळे जिल्ह्यात बालविवाहाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असल्याचे दिसून येत आहे.

शिरपूर येथे मुलगी अत्पवयीन असताना तिच्या आईवडिलांनी तिचे लग्न जबरदस्तीने एका युवकासोबत लाऊन दिले होते, विवाह नंतर काही काळानंतर हि अत्पवयीन मुलगी गर्भवती राहिली होती. यानंतर नुकताच तिने बाळाला जन्म दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. प्रकरण उघडकीस आल्यानंतर यासंदर्भात त्वरित शिरपूर पोलीस ठाण्यात मुलीचे आईवडील, पती तसेच सासू सासरे यांच्या विरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संबंधित सर्व संशयीत आरोपी सध्या फरार आहेत. याबाबत पोलिसांकडून सध्या त्यांचा शोध सुरू आहे.

शिरपूर तालुक्यात या घटनेमुळे बालविवाह सारख्या गंभीर सामाजिक समस्येचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कायद्याने बंदी असतानाही अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. तसेच समाजातील जनजागृतीवर प्रश्न निर्माण होत आहे.

१६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाल्याची माहिती शिरपूर शहर पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांना मिळाली होती. त्यानुसार परदेशी यांनी या प्रकरणाची चौकशी करून घडलेला प्रकार खरा असल्याचे दिसून आले आहे. यात त्या अल्पवयीन मुलीचे १७ व्या वर्षी बाळंतपण झाल्याने तिने पुरुष अर्भकाला जन्म दिला. या प्रकरणी मुलीचे आईवडील, पती आणि सासू सासरे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम, बालकांचे लैंगिक अत्यारापासून संरक्षण अधिनियम व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम अन्वये शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपविभागीय अधिकारी विश्वजीत जाधव यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार करीत आहेत.

१८ वर्षाच्या आत मुलीचा तसेच २१ वर्षाच्या आत मुलाचा विवाह करणे बेकायदेशीर असून तो अपराध आहे. त्यासाठी कायद्यामध्ये गंभीर स्वरूपाचे कार्यवाहीची आणि दंडाची तरतूद आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही बालविवाहाला प्रोत्साहन देऊ नये. असे आवाहन धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, पोलिस उपविभागीय अधिकारी विश्वजीत जाधव, शिरपूर शहर पोलीस निरीक्षक किशोर परदेशी तसेच उपनिरीक्षक हेमंत खैरनार यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---