‘कैसे हराया’ म्हणणारी नगरसेविका कारवाईच्या भीतीने ‘नॉट रिचेबल’

---Advertisement---

 

ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मुंब्रा मधील निवडून आलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख या सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत मोठी शंका उपस्थित झाल्यानंतर संबंधित प्रमाणपत्र अवैध आल्याची माहिती समोर आली असल्याने त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे.

या घटनेनंतर सहर शेख आणि त्यांचे वडील युनुस शेख हे दोघेही संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने या प्रकरणाची चर्चा अधिकच रंगली आहे. ठाणे विभागीय कार्यालयाकडून जात प्रमाणपत्राबाबत अवैध प्रमाणपत्र असल्याचा निष्कर्ष समोर आल्यानंतर मुलगी आणि वडील गेल्या दोन दिवसांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे सांगितले जात आहे.

या संपूर्ण प्रकरणावर त्यांनी अद्याप कुठलीही अधिकृत बाजू मांडलेली नाही. दरम्यान तहसीलदारांनी प्रशासनाची दिशाभूल केल्याच्या आरोपांवरून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्यामुळे त्यांच्यावरील कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या सर्व घटनेनंतर सहर शेख यांनी माध्यमांवर प्रतिक्रिया देत आपल्याविरोधात कट रचला जात असल्याचा आरोप केला आहे. विरोधकांकडून द्वेषाचे वातावरण निर्माण केले जात असून आपण सत्याच्या बाजूने उभे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. कठीण काळातही विश्वास टिकवून ठेवण्याचे आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना केले आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, युनुस शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी असून महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी मागास प्रवर्गासाठी असलेला वेगळा नमुना वापरून जात प्रमाणपत्र मिळवले. त्याच आधारावर सहर शेख यांनीही संबंधित प्रमाणपत्र मिळवून निवडणूक लढवली असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रक्रियेत विविध शासकीय यंत्रणांची दिशाभूल झाल्याचा आरोप असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. एकूणच, या घडामोडींमुळे ठाणे महापालिकेच्या राजकारणात खळबळ उडाली असून पुढील काळात प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---