भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रियाचे फेडरल चान्सलर डॉ. ख्रिश्चन स्टॉकर यांच्या नेतृत्वात भारत-ऑस्ट्रिया द्विपक्षीय शिखर परिषद संपन्न…!

---Advertisement---

 

दिल्लीच्या हैद्राबाद हाऊस येथे आयोजित भारत आणि ऑस्ट्रिया द्विपक्षीय शिखर परिषद मध्ये दोन्ही देशांतील संबंधांना धोरणात्मक पातळीवर नेण्यावर विशेष भर देण्यात आला. संरक्षण तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर उत्पादन, शाश्वत पायाभूत सुविधा तसेच उच्च-तंत्रज्ञान सहकार्य या क्षेत्रांना प्राधान्य देत, उन्नत भारत-ऑस्ट्रिया भागीदारी अधिक दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी व्यक्त केला.

हैद्राबाद हाऊस येथे आयोजित या शिखर परिषदेचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रियाचे फेडरल चान्सलर डॉ. ख्रिश्चन स्टॉकर यांनी केले. या बैठकीत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यांच्यासह केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचा सहभाग होता.

ऑस्ट्रियाचे फेडरल चान्सलर डॉ. ख्रिश्चन स्टॉकर यांनी युरोपबाहेरील पहिल्या अधिकृत दौऱ्यासाठी भारताची निवड केल्याने, जागतिक स्थैर्य आणि आर्थिक नवोन्मेषाबाबत दोन्ही देशांची सामायिक बांधिलकी अधोरेखित झाली. दोन्ही नेत्यांनी व्यापार व गुंतवणूक, तंत्रज्ञान व नवोन्मेष, हरित व स्वच्छ तंत्रज्ञान, शैक्षणिक व सांस्कृतिक देवाणघेवाण, लोक-ते-लोक संबंध तसेच बहुपक्षीय मंचांवरील सहकार्य यांसह द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंवर सविस्तर चर्चा केली.

दोन्ही देशांनी राजनैतिक संबंधांच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने नव्याने झालेल्या करारांच्या (MoUs) अंमलबजावणीसाठी एक ठोस रोडमॅप निश्चित केला आहे. उच्च-तंत्रज्ञानाधारित संरक्षण उत्पादनातील संयुक्त उपक्रम आणि भारतीय स्टार्टअप्सना युरोपियन परिसंस्थेत समाविष्ट करण्यावर पुढील काळात विशेष भर दिला जाणार आहे.

---Advertisement---

 

दोन्ही नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध, विशेषतः सीमापार दहशतवादाविरुद्ध, कठोर कारवाई करण्याच्या आपल्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला. तसेच, भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या अंमलबजावणीमुळे व्यापार, उत्पादन, गुंतवणूक आणि विशेषतः तरुणांसाठी रोजगारनिर्मितीच्या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होतील, असे मतही व्यक्त करण्यात आले.

या शिखर परिषदेत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार, नवोन्मेष, कौशल्य विकास, दहशतवादविरोधी सहकार्य आदी विविध क्षेत्रांमध्ये एकूण १५ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच सागरी आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट करण्यासाठीही दिशा निश्चित करण्यात आली.

ही शिखर परिषद बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत-ऑस्ट्रिया भागीदारीला स्थैर्याचा एक मजबूत आधारस्तंभ ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---